Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जातीय दंगली घडताना दिसत आहे. या ठिकाणची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्याचबरोबर मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. अशात मणिपूरचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Two women were stripped by a mob in Manipur
मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढण्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर त्यांनी या महिलांवर सामूहिक बलात्कार केला आहे.
या घटनेचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याच प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “मणिपूरमधील घटना अतिशय दु:खद आहे, याबाबत कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही.
ही घटना केवळ मणिपूर नाही तर 140 कोटी देशवासीयांना प्रचंड वेदना देणारी आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे कालच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितले आणि 4 आरोपींना अटक सुद्धा झाली.”
मणिपूरमधील घटना अतिशय दु:खद आहे, याबाबत कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही.
ही घटना केवळ मणिपूर नाही तर 140 कोटी देशवासीयांना प्रचंड वेदना देणारी आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे कालच मा.पंतप्रधान @narendramodi नरेंद्र मोदीजी यांनी सांगितले आणि 4 आरोपींना अटक… pic.twitter.com/vGACHM2H77
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 21, 2023
“महिला सुरक्षा हा विषय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अधिक गांभीर्याने घेतला आणि सर्वच राज्यांना महिला सुरक्षेचे कायदे अधिक कठोर करण्यास सांगितले.
वेदना जाणवून थांबून जाणे किंवा नुसते विव्हळत राहणे, हा कुठल्याच समस्येवरील उपाय असू शकत नाही, तर वेदनेवर उपचार अधिक महत्वाचा असतो.
मा. नरेंद्र मोदीजी यांची हीच कार्यशैली नेहमी राहिली आहे, आम्हाला खात्री आहे,मणिपूरच्या दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही”, असही त्यांनी या (Chitra Wagh) ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगला परिसरात झळकले बॅनर्स
- Congress | 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत काँग्रेसचं विरोधी पक्षनेते पदासाठी थेट हायकमांडला पत्र
- Sanjay Raut | अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील – संजय राऊत
- Ajit Pawar | शरद पवार गटाला मोठा धक्का! नागालँडमधील आमदारांनी अजित पवारांना दर्शवला पाठिंबा
- Aditya Thackeray | सरकारला ही दुर्घटना टाळता आली असती असं वाटतं का? इर्शाळवाडी घटनेवरून आदित्य ठाकरेंचा सवाल