Supriya Sule | शिंदे गटातील नेत्यांना खासदार सुप्रिया सुळेंच सणसणीत उत्तरं!

Supriya Sule | मुंबई : काल रात्री (11 एप्रिल) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पवार-ठाकरेंची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. तर शिंदे गटातील नेत्यांकडून देखील उद्धव ठाकरेंवर टीका टिप्पणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे गटाला सणसणीत उत्तर दिलं आहे.

या भेटीनंतर शिंदे गटाचे नेते मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरेंना सवाल केला की, सगळं गुंडाळून काका मला वाचवा म्हणायला तर सिल्व्हर ओकला गेला नाहीत ना? तर सकाळी मातोश्रीवर स्वाभीमानाच्या बाता मारायच्या आणि संध्याकाळी सिल्वर ओकवर जाऊन लोटांगण घालणाऱ्यांनी मातोश्रीचं नाव धुळीला मिळवलं आहे. बाळासाहेबांचे वारसदार म्हणवण्याचा त्यांना मुळीच नैतिक अधिकार राहिला नसल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली. याचप्रमाणे आजपर्यंत ‘मातोश्री’चा इतिहास महाराष्ट्राने बघितला  राजकीय खलबत असो किंवा राजकीय चर्चा, ते सर्व ‘मातोश्री’वर जात होते. हा सगळा बाळासाहेबांचा वारसा गुंढाळून ठेवून उद्धव ठाकरे हे सिल्व्हर ओकवर गेले. लाचारांची स्वारी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी, असं म्हणत शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्वीट केलं आहे. या सर्व टिकांना सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.

ही सर्वसाधारण मराठी कुटूंबातील संस्कृती आहे : सुप्रिया सुळे  (This is the culture of a common Marathi family: Supriya Sule)

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्यामध्ये मराठी मध्यमवर्गीय संस्कार झालेले आहेत. त्यामुळे आपल्यापेक्षा वयाने मोठं असलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या घरी जाताना कुठलाही कमीपणा वाटत नाही. ही सर्वसाधारण मराठी कुटूंबातील संस्कृती आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या आणि हक्काच्या माणसाकडे मग तो मोठा असो वा छोटा, त्यांच्याकडे हक्काने उठून जाण्यात कुठला कमीपणा आणि मोठेपणा? असा सवाल विचारत सुप्रिया सुळेंनी टीकेला जोरदार शब्दात उत्तर दिलं आहे. पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की,  इगो नसावा हे अगदी महाभारतातही सांगण्यात आलंय. हे आपले संतही आपल्याला शिकवतात. प्रेमाच्या नात्यात कुणीही छोटं किंवा मोठं नसतं. त्या प्रेमाच्या नात्यातला ओलावा जास्त महत्वाचा असतो.  असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.  या उत्तरानें शिंदे गटातील नेत्यांना चांगलाच चाप बसला असल्याचं देखील बोललं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-