Bacchu Kadu | आमदार बच्चू कडू यांना मिळाला ‘या’ मंत्रीपदाचा दर्जा

Bacchu Kadu | मुंबई: आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यामध्ये जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग दारी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष पद आणि प्रमुख मार्गदर्शक हे पद आमदार बच्चू कडू यांना दिलं आहे.

Minister status announced to MLA Bacchu Kadu

बच्चू कडू (Bacchu Kadu) वारंवार नाराज असल्याचे दिसून येत होतं. मंत्रीपद कधी मिळणार यावरून देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड करण्यात आलेली असून त्यांना या मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना मंत्रीपदाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. बच्चू कडू गेल्या वीस वर्षापासून दिव्यांगांसाठी लढा देतं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या 50 आमदारांपैकी प्रत्येकालाच मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांचा अपेक्षाभंग झाला. याबाबत काहींनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.