Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र शासनासोबत नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 577 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना दिनांक 17 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

विविध पदांच्या एकूण 577 रिक्त (Total 577 Vacancies for Various Posts)

केंद्र सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 577 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये अंमलबजावणी अधिकारी/ लेखा अधिकारी आणि सहाय्यक भविष्य निधी आयुक्त पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

महत्वाच्या तारखा (Important dates)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 25 फेब्रुवारी 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तर पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना दिनांक 17 मार्च 2023 पर्यंत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://upsc.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1bi7ZAP0sYBc1lwk9uxwgECkO8WTb_-H1/view

महत्वाच्या बातम्या