Weather Update | राज्यात आजपासून पुन्हा होणार थंडीत वाढ, हवामान विभागाचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यात कमाल आणि किमान तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. थंडी (Cold) चा जोर कमी होऊन उन्हाचा (Heat) चटका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आजपासून (23 फेब्रुवारी) पुढचे पाच दिवस किमान आणि कमान तापमानात घसरन होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिवसा जाणवत असलेल्या उन्हाच्या झळा देखील कमी होण्याचा अंदाज आहे.

राज्यात थंडीचा जोर कमी होणार (The force of cold will reduce in the state)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), कोकणासह नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात दिवसातील दुपारच्या कमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसाचा उन्हाचा तडाकाही कमी होऊ शकतो. त्याचबरोबर 25 फेब्रुवारीपासून नवीन सक्रिय होणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात 25 आणि 26 फेब्रुवारीला मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आल्हाददायक वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यभरात थंडीचा जोर कमी झाला आहे. उन्हाळा सुरू झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर कोकण किनारपट्टीवर उष्णतेचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा 30 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी 11 ते 4 या वेळेत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन खात्याकडून सातत्याने केले जात आहे. अशा परिस्थितीत आजपासून उन्हाचा चटका कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

आजपासून उन्हाचा चटका कमी होणार असला तरी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवा. उन्हाळ्यात लिंबू पाणी, सरबत, ज्यूस इत्यादी गोष्टी प्या. त्याचबरोबर घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.