IND vs AUS | पुणेकरांसाठी खुशखबर! ऑस्ट्रेलियाविरुद्धचे कसोटी सामने पुण्यासह ‘या’ ठिकाणी होण्याची शक्यता

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरू आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यांमध्ये भारतीय संघाची पकड मजबूत दिसत आहे. अशात या मालिकेतील पुढील वेळापत्रकात बदल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल केला जाऊ शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर या मालिकेतील तिसरा सामना धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तिसरा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सामन्याच्या ठिकाणात बदल केला जाऊ शकतो. धर्मशाळेच्या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात गेल्या फेब्रुवारीमध्ये खेळला गेला होता. त्यानंतर या मैदानावर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही.

धर्मशाळा येथील स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. त्यानंतरही हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या योग्य होऊ शकले नाही. बोर्डाच्या तज्ञांच्या टीमने केलेल्या मैदानाच्या तपासणी निकालानंतर बीसीसीआय या सामन्याच्या ठिकाणांबद्दल अंतिम निर्णय घेणार आहे. बीसीसीआयने बॅकअप ठिकाणांची आधीच निवड करून ठेवली आहे.

IND vs AUS कसोटी सामन्यासाठी बॅकअप स्टेडियम (Backup stadium for IND vs AUS test match)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यांच्या बॅकअप ठिकाणांबद्दल बोलायचे झाले तर, तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी राजकोट, पुणे, इंदोर आणि विशाखापट्टणम हे ठिकाण शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. बोर्डाच्या तज्ञांच्या तपासणी दरम्यान धर्मशाळा मैदान अपयशी ठरल्यास तिसरा कसोटी सामना या मैदानांवर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.