Ramdas Athawale | मलाही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचंय – रामदास आठवले

Ramdas Athawale | सांगली: गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील मला मुख्यमंत्री व्हायचं म्हटलं आहे. मला देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं रामदास आठवले यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, “आजकाल प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हायचे आहे, ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्यासाठीच हे शक्य आहे. मात्र, मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “मी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे. मात्र, सध्या आमचे सरकार स्थिर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्कृष्ट कामगिरी करत आहे. ते दिवसाला सोळा ते अठरा तास काम करतात. एकनाथ शिंदे कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत”, असं म्हणत आठवलेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं.

दरम्यान, धाराशिव येथे अजित पवारांचे (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले होते. यावरूनही अजित पवारांनी पोस्टर लावणाऱ्यांना फटकारलं आहे. “अशा प्रकारचे बॅनर्स लावू नये, बॅनर्स लावून कोणीही मुख्यमंत्री होत नाही”, असं अजित पवार पोस्टर प्रकरणावर म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या