Chitra Wagh vs Sanjay Raut | हिरवा साप गळ्यात घेऊन फिरणारे जनाब सर्वज्ञानी; चित्र वाघांचा निशाणा नेमका कोणावर नेटकर्यांना प्रश्न

Chitra Wagh vs Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. अशात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खगरे (Mallikarjun Khagre) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सापासोबत तुलना केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले आहे. त्यानंतर या वादामध्ये ठाकरे गटाने उडी घेतली आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. साप हा शेतीचा राखणदार आहे. त्याचबरोबर शंकराच्या गळ्यातही सापच आहे. भाजपाचे लोक पीएम मोदींना शंकराचा अवतार म्हणून संबोधतात. मग सापाचा एवढा तीटकारा का? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

ठाकरे गटाने केलेल्या विधानानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांचे ट्विट – हिरवा साप गळ्यात घेऊन फिरणारे जनाब सर्वज्ञानी @rautsanjay61
पंतप्रधान @narendramodi
जीं वर टिका करू लागलेत.

राऊतांना काँग्रेसची हुजरेगिरी करावी लागतेय, यापेक्षा दुर्देव काय असणार? त्
यांची निष्ठा आता कांग्रेसच्या चरणी वाहतेय.

सत्तेसाठी खुर्च्या उचलणारे राऊत आता काँग्रेस नेत्यांच्या चपलाही उचलायला लागलेत, यात आश्चर्य ते काय ?

चित्रा वाघ यांच्या ट्वीटवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे. यामध्ये एका वापरकर्त्यांने प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला आहे. त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा एका सभेतील हिरवी शाल गळ्यात असलेला फोटो पोस्ट करत चित्रा वाघ यांना  सवाल केला आहे. या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ नेमका कुणावर निशाणा साधत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

वापरकर्त्यांचे ट्विट- गळ्यात हिरवा साप घेऊन फिरणारे  काय पण भारी उपमा दिलीय. दोन दिवसांपुर्वीचा हा कर्नाटक मधील फोटो. संरक्षण मंत्र्यांवरच टिका…. मेरा देश बदल रहा है.

भगवान शंकराने विष पाचवले आहे, म्हणून ते नीलकंठ झाले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही लोक विष्णू आणि शंकराचे अवतार वाटतात. अशाच साफ गळ्यात घालून विष पचवणाऱ्या शंकराशी तुलना करतात राजकीय तांडव करण्याची काय गरज आहे? असा शाब्दिक हल्ला शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.