Share

Amit Shah | अमित शाह पुन्हा मुंबई दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

Amit Shah | मुंबई: गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. यामध्ये भाजपच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप महत्वाच्या भूमिका पार पाडत आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्र दौरे वाढतं असल्याचे दिसले आहे. अमित शाह पुन्हा एकदा मुंबई … Read more

Published On: 

Amit Shah | मुंबई: गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. यामध्ये भाजपच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप महत्वाच्या भूमिका पार पाडत आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्र दौरे वाढतं असल्याचे दिसले आहे. अमित शाह पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर असणार आहे.

राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं दिसत आहे. कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्प, जोडे प्रकल्प इत्यादी वाद सुरू आहेत. तर दुसरीकडे अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे नेतृत्व बदलांच्या चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसापूर्वी नागपूर दौऱ्यावर येणार होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांना तो दौरा रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा ते मुंबई दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.

दोन आठवड्यापूर्वी अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांचा हा एप्रिल महिन्यातला दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. ते त्यांच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी मुंबई दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या या दौऱ्यानंतर येत्या काळात काही नवीन राजकीय घडामोडी घडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही