बीड – माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून ( Dhananjay Munde Resignation ) विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, “धनंजय मुंडे हे तुमचे वेडे, दुतखुळे कार्यकर्ते नाहीत; महाराष्ट्र सुसंस्कृत आहे,” अशा शब्दांत धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगितले असले तरी, खरे कारण लपवले जात आहे का? या चर्चांना आता उधाण आले आहे.
काल ठणठणीत असणारे धनंजय मुंडे अचानक प्रकृतीच्या कारणावरून राजीनामा देतात, हे मनाला पटणारे नाही, अशा शब्दांत विरोधकांनी मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो काल व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती.
या फोटोंमुळे मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रोश वाढला. सोशल मीडियावर आणि जनतेत प्रचंड संताप दिसून आला. परिणामी, सत्ताधाऱ्यांवरील दबाव वाढल्यानंतर मुंडेंनी आज अचानक राजीनामा दिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजीनाम्याची कारणमीमांसा करताना मुंडे यांनी “माझी प्रकृती ठीक नसल्याने मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो,” असे सांगितले. मात्र, हे खरे कारण आहे का? की संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाढलेल्या दबावामुळे त्यांनी माघार घेतली? या चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनीही यावर सरकारला लक्ष्य केले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निष्क्रीयतेचे आरोप होत आहेत.
मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले असले तरी, खरे कारण काय आहे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत नागरिकांना माहित असल्याचे विरोधकांनी सांगितले. “धनंजय मुंडे हे तुमचे वेडे, दुतखुळे कार्यकर्ते नाहीत; महाराष्ट्राला माहित आहे की, तुम्ही काय केले ते!” अशा शब्दांत विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून (Santosh Deshmukh murder case) धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. राजीनामा देण्यासाठी तब्बल दोन महिने लागले, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सरकारने वेळकाढूपणा केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत, “हा निर्णय उशिरा घेतला गेला, तो आधीच व्हायला हवा होता” असे ठाम मत व्यक्त केले आहे. राजकीय वर्तुळात आता धनंजय मुंडे यांना संरक्षण दिले जात होते का? त्यांनी काही लपवण्यासाठीच राजीनामा उशिरा दिला का? अशा चर्चांना ऊत आला आहे. या प्रकरणावर अजून कोणते नवे खुलासे होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? दोषींवर कठोर कारवाई केली जाणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत महाराष्ट्रातील संताप शांत होणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या