Dhananjay Munde । काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे (Santosh Deshmukh murder case) फोटो, व्हिडीओ समोर आले आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा जोर अधिकच वाढला. याच पार्श्वभूमीवर काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक झाली.
अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्या धनंजय मुडेंचा राजकीय प्रवास कसा होता? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना राजकारणात आणले होते. त्यांची 2007 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड झाली होती. पण गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना 2009 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.
Dhananjay Munde leave BJP in 2012
याच कारणामुळे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात टोकाचे वाद झाले. धनंजय मुंडे यांनी 2012 मध्ये भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना पंकजा मुंडे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्याकडे 2014 मध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली होती.
पंकजा मुंडे यांच्याकडून 2014 साली झालेल्या निवडणुकीमधील पराभवाचा बदला त्यांनी 2019 च्या निवडणुकीत घेतला. त्यांनी पंकजा मुंडे यांचा 30,000 मतांनी पराभव केला होता. अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते.
महत्त्वाच्या बातम्या :