Share

राम सातपुते यांच्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे गृहमंत्री पद धोक्यात; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

Devendra Fadnavis । सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या बैठकीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन मोशी समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.

यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ते गुन्हे मागे घेऊ, चिंता करण्याचे काही कारण नाही असे त्या बैठकीत उपस्थितांना आश्वासित केले होते.

निवडणुकीच्या काळात अशा पद्धीतने प्रलोभन देणे, आश्वासन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागणे घेता येत नाहीत. तरीही मतदारांना प्रलोभन देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांना  गृहमंत्री पदावरून तात्काळ दूर करावे तसेच सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करा, अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Complaint against Devendra Fadnavis to Election Commission

काँग्रेस पक्षाने केलेल्या तक्रारीमुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत वाढ झाली असून गृहमंत्री पदही धोक्यात आले आहे. फडणवीसांवर आचारसंहितेचा भंग, मतदारांना प्रलोभन देण्याचा ठपका काँग्रेस कडून ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोग तक्रारीची कितपत दखल घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. निवडणूक आयोगाकडे पंतप्रधान मोदी पासून ते भाजपच्या सामान्य कार्यकर्तांपर्यन्त अनेक तक्रारी दाखल आहेत. परंतु आयोगाने भाजपवर कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप विरोधक करतात.

महत्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis । सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या बैठकीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now