Share

Chitra Wagh | तुमच्यासारख्या भामट्यांमुळे राजकारणाचा दर्जा खालवलायं; चित्रा वाघांनी संजय राऊतांना धारेवर धरलं

🕒 1 min read Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नागपूरचा कलंक असा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. या प्रकरणावर संजय … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नागपूरचा कलंक असा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. या प्रकरणावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊतांच्या वक्तव्याला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

The entire government of Maharashtra is tainted – Sanjay Raut

संजय राऊत यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीका केली होती. ट्विट करत संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे संपुर्ण सरकारच कलंकित आहे. PMLA कायद्यानुसार आरोपी कडील कलंकित धन दुसऱ्याच्या खात्यावर गेले की तो सुध्दा गुन्हेगार ठरतो. राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडील सर्व कलंकित खाती” खातेदारांसह भाजपा सरकार मध्ये सामील झाली..mony laundring चे हे सरळ प्रकरण आहे.ED ने संपुर्ण सरकारवरच PMLA नुसार कारवाई करायला हवी. महाराष्ट्र इतका कलंकित कधीच झाला नव्हता.”

संजय राऊतांच्या टीकेला चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “सर्वज्ञानी संजय राऊत तुम्ही पत्राचाळीत शेण खाऊन आधीच तोंड काळं केलं आहे…मराठी माणसाशी केलेली गद्दारी आणि तुमच्या अंगाला चिटकलेला भ्रष्टाचाराचा डाग गंगेत डुबकी मारूनही धुवून निघणार नाही… तुमच्या सारख्या भामट्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा खालावला आहे.”

दरम्यान, काल (10 जुलै) नागपूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करणे अशक्य आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांची ही ऑडिओ क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंनी त्यांना ‘नागपूरला लागलेला कलंक’ असं संबोधलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि भाजप (Chitra Wagh) यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही