Dhananjay Munde | छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडेंना जीवे-मारण्याची धमकी

Dhananjay Munde | परळी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे-मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना फोन कॉलच्या माध्यमातून जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना धमकीचा फोन आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

The person making the threat has demanded Rs 50 lakh

छगन भुजबळ यांच्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानी हा धमकीचा फोन आल्याची माहिती मिळाली आहे. फोनवर धमकी देणाऱ्या व्यक्तीनं 50 लाख रुपयांची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यामुळे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना हा धमकीचा फोन आला होता का? अशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मला तुम्हाला मारायची सुपारी मिळालेली असून, उद्याच मी तुम्हाला मारणार आहे, असं त्या व्यक्तीनं म्हटलं (Dhananjay Munde) होतं. या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी लगेच तपास सुरू केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या दोषी तरुणाला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर छगन भुजबळ यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर भुजबळ आणि धनंजय मुंडेंना  (Dhananjay Munde) धमकीचा फोन आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.