Amol Kolhe | महाराष्ट्रात मिठाचा खडा टाकणारे शकुनी मामा कोण? – अमोल कोल्हे

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला असल्याचं बोललं जात आहे. राज्यात मिठाचा खडा टाकणारा शकुनी मामा कोण? असा सवाल अमोल कोल्हे यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे?

ट्विट करत अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, “मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा कोण? महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही!” अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतलं नाही. मात्र, त्यांचा रोख देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. अमोल कोल्हे यांनी या ट्विटमध्ये नाशिकच्या येवल्यात झालेल्या भाषणाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

Mahabharata happened because of Shakuni Mama – Amol Kolhe

या व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणतात, “जेव्हा आपण महाभारताचा विचार करतो तेव्हा आपण फक्त गौरव आणि पांडव म्हणतो. महाभारत कुणामुळे घडलं कौरवांमुळे की पांडवांमुळे? असं आपण म्हणत असतो. मी काहीही म्हटलं नाही, तरी लोकांच्या मनात जे काही आहे. शकुनी मामामुळे महाभारत घडलं आहे. कौरव-पांडव हे दोन भाऊ एकत्र येऊन मुकाबला करत होते. यांच्यात मिठाचा खडा शकुनी मामानं टाकला.”

दरम्यान, अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अमोल कोल्हे यांनी या ट्विटमध्ये कोणत्या नेत्याचं नाव घेतलेले नाही. मात्र, ते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलत असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.