Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गट आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये बोलताना केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे. जे (देवेंद्र फडणवीस) दुसऱ्यांसाठी जगतात ते कलंक कसे ठरवतील? असं आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात, असेही ते या ट्विटमध्ये म्हणाले आहे.
Those who rob Mumbaikars are deciding the stigma – Ashish Shelar
ट्विट करत आशिष शेलार म्हणाले, “उध्दवजी, जे दुसऱ्यांसाठी जगतात ते कलंक कसे ठरतील? कलंक तर ते असतात
◆जे नाल्यातील गाळ खातात
◆कोविडमध्ये सुध्दा भ्रष्टाचार करतात
◆गरिबांच्या पोरांच्या दप्तर, पाटी पेन्सिल मध्ये पण कट कमिशन खातात
◆जे रस्त्यावरचे डांबर खातात
◆जे “मी आणि माझं कुटुंब” एवढंच जगतात
थोडक्यात काय तर..
◆जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात!”
उध्दवजी, जे दुसऱ्यांसाठी जगतात ते कलंक कसे ठरतील?
कलंक तर ते असतात
◆जे नाल्यातील गाळ खातात
◆कोविडमध्ये सुध्दा भ्रष्टाचार करतात
◆गरिबांच्या पोरांच्या दप्तर, पाटी पेन्सिल मध्ये पण कट कमिशन खातात
◆जे रस्त्यावरचे डांबर खातात
◆जे "मी आणि माझं कुटुंब" एवढंच जगतातथोडक्यात काय…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 11, 2023
दरम्यान, नागपूरमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर (Ashish Shelar) खोचक टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करणे अशक्य, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांची ही ऑडिओ क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंनी त्यांना नागपूरला लागलेला कलंक, असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Amol Kolhe | महाराष्ट्रात मिठाचा खडा टाकणारे शकुनी मामा कोण? – अमोल कोल्हे
- Nitesh Rane | आदित्य ठाकरे, ठाकरे नावावर कलंक; नितेश राणेंची ठाकरे गटावर सडकवून टीका
- Sanjay Raut | सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस कलंकित काळी हळद लावून बसलेय – संजय राऊत
- Sanjay Raut | महाराष्ट्राचे संपुर्ण सरकारच कलंकित – संजय राऊत
- Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना फोनवरून मिळाली जीवे-मारण्याची धमकी