Chitra Wagh | मुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रक्ष प्रवेश केला आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) खोचक टीका केली आहे.
Some people of Shinde group are in touch with us – Sanjay Raut
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत संजय राऊतांवर टीका केली आहे. स्वतःला खोटा दिलासा देणं कसं जमतं? असा सवाल चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. शिंदे गटाचे काही लोक आमच्या संपर्कात असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून देखील चित्रा वाघ यांनी त्यांना सुनावलं आहे.
ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाला, “‘उठा’ठेवी करणाऱ्यांचा आणखी एक गडी आऊट..! दिवसेंदिवस पक्षाला गळती लागत असतानाही, शिंदे गटाचे १७-१८ आमदार आमच्या संपर्कात असल्याच्या फुशारक्या मारणाऱ्या सर्वज्ञानींच्या कॉन्फिडन्सला दादच द्यायला हवी.. संजय राऊत यांना कसं काय जमतं बुवा स्वतःलाच खोटा दिलासा देणं..?”
शिंदे गटाचे काही लोक आमच्या संपर्कात आहे असं संजय राऊत म्हणाले होते. ते म्हणाले, “ठाकरे गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहे. आमच्या समोर येऊन ते त्यांची व्यथा मांडत असतात. आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतो कारण ते आमचे जुने सहकारी आहेत.”
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde | “… तर हा देखील मोठा गुन्हा आहे”; पंकजा मुंडेंचा देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
- Ajit Pawar | दगाबाजी! शरद पवारांना समर्थन करणारे आमदार अजित पवारांसोबत
- Vijay Wadettiwar | पंकजाताई काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचं स्वागत करू – विजय वडेट्टीवार
- Nikhil Wagle | मराठी माणसाचे पक्ष फोडण्यासाठी मोदी-शहा यांनी मराठी माणसाचाच वापर केला – निखिल वागळे
- Dhananjay Munde | आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर बहीण भावाचे नाते कायम अबाधित; धनंजय मुंडेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत