IND vs AUS | कसोटी मालिका सुरू होण्याआधी BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूंच्या संघात समावेश

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लवकरच चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ कंबर कसून सराव करत आहे. टीम इंडियाने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या नेतृत्वाखाली सरावाला सुरुवात केली आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल होताना दिसणार आहे. भारतीय संघामध्ये चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने संघामध्ये नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, साई किशोर आणि राहुल चहर ही नावं आहे. हे चार खेळाडू संपूर्ण मालिकेसाठी टीम इंडियासोबत राहतील. या मालिकेमध्ये फिरकीपटूंचे वर्चस्व राहणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंना टक्कर देण्यासाठी सुसज्ज झाला आहे.

भारतीय संघामध्ये जयदेव उनाडकर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव हे चार वेगवान गोलंदाज आहेत. तर, टीम इंडियामध्ये वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, साई किशोर आणि राहुल चहर यांचा फिरकीपटू म्हणून समावेश करण्यात आला आहे. संघामध्ये फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि रविचंद्र अश्विन यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना नवी दिल्ली येथे 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान खेळण्यात येणार आहे. 1 ते 15 मार्च दरम्यान या मालिकेतील तिसरा सामना धर्मशाळा येथे होणार आहे. तर या मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना 9 ते 13 मार्च दरम्यान अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.