Share

Siddharth-Kiara Wedding | सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचे वऱ्हाड राजस्थानला रवाना

Siddharth-Kiara Wedding | जैसलमर: बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) 6 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. हे दोघे राजस्थानमधील जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहे. दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची पूर्णपणे तयारी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांच्या लग्नाचे वऱ्हाड राजस्थानला रवाना झाले आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी लग्नासाठी जैसलमेरला रवाना झाली आहे. ती तिच्या कुटुंबासोबत कलिना विमानतळावर दिसली आहे. विमानतळावर या नववधूच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक बघायला मिळाली. यावेळी तीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला असून त्यावर गुलाबी रंगाची शाल ओढली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध मेहंदी कलाकार वीणा नागदा कियाराच्या हातावर लग्नाची मेहंदी काढणार आहे. वीणा नागदाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये ती राजस्थानला रवाना झाली होती. वीणा नागदाने कियारापूर्वी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीच्या हातावर मेहंदी काढली आहे.

5 फेब्रुवारीपासून या दोघांचे लग्न आधीचे सोहळे पार पडणार आहे. यामध्ये हळद, मेहंदी, साखरपुडा यांचा समावेश असेल. या दोघांचा लग्न सोहळा 100 ते 125 पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. सूर्यगडपॅलेस मधील लक्झरी व्हीला पाहुण्यांसाठी बुक करण्यात आला आहे. 4 फेब्रुवारीपासून सूर्यगड पॅलेसमध्ये पाहुणे पोहोचायला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Siddharth-Kiara Wedding | जैसलमर: बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) 6 फेब्रुवारी रोजी लग्न …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now