Sanjay Raut | “विश्वासघात हा विश्वासू माणसांकडूनच होतो हे अजित पवारांना…”; संजय राऊतांचं प्रत्युत्तर 

Sanjay Raut | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. शिवसेनेतल्या फुटीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना नेतृत्वाला जबाबदार धरल्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गाफील नाही तर त्यांनी आपल्या विश्वासूंवर अधिक विश्वास दाखवला, असं संजय राऊत म्हणाले.

आपल्या विश्वासू लोकांवर जास्त विश्वास ठेवला आणि विश्वासघात हा विश्वासू माणसांकडूनच होत असतो. हे अजित पवारांना माहीत आहे. ते त्यांना सांगायला नको, असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या विधानावर पलटवार केला. आम्हीही या सगळ्या हालचाली उद्धव ठाकरेंना सांगत होतो. सुगावा सगळ्यांनाच लागला होता. तरीही हे लोकं विश्वासाचे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं.

अजित पवारांचा गौप्यस्फोट काय?

अजित पवार म्हणाले की, “आमदार फुटणार असल्याची महिती उद्धव ठाकरेंना दोन-तीन वेळा दिली होती शरद पवार साहेबांनी फोन करुन उद्धव ठाकरेंसोबत मीटिंग केली होती. पण माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण स्वत: पक्ष नेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला. तिथेच खरी गफलत झाली.”

महत्वाच्या बातम्या :