Shambhuraj Desai | छत्रपती उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांच्यात ‘पेटिंग’वरुन मोठा वाद; पोलीस बंदोबस्त तैनात

Shambhuraj Desai | सातारा : साताऱ्यामधील एका इमारतीवर छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे पेटिंग काढण्याचे काम सुरु होते. त्याला लोकप्रतिनिधींनी त्या पेटिंगला विरोध केला. त्यामुळे सातारा पोलिसांनी (Satara Police) साताऱ्यातील पोवई नाकामधून खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

छत्रपती उदयनराजेंच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

मंगळवारी (आज) सकाळी पेंटरकडून पुन्हा पेंटिंग काढण्याचं काम सुरू करण्यात आलं. या पेंटरला पोलिसांनी विरोध करत काम थांबवण्यास सांगितलं. यावेळी पेंटर पाटोळे आणि पोलिसांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी पेंटरला ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे.

छत्रपती उदयनराजे-शंभूराज देसाई यांच्यात वाद

साताऱ्यातील राहुल पाटोळे हे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक असून त्‍यांनी खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त तालीम संघाजवळील एका इमारतीच्‍या भिंतीवर त्यांचे मोठे छायाचित्र रेखाटले आहे. त्‍याच धर्तीवर त्‍यांनी पोवईनाका येथे असणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्‍या मालकीच्या इमारतीच्‍या भिंतीवर छायाचित्र काढण्‍यासाठीची तयारी सुरु केली होती.

क्रेनच्‍या माध्‍यमातून भिंत रंगविल्‍यानंतर शनिवारी त्‍याठिकाणी छायाचित्र काढण्‍याच्‍या कामास प्रत्‍यक्ष सुरुवात झाली. यासाठी आणलेली क्रेन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍या निवासस्‍थानाच्‍या प्रवेशव्‍दारावर उभी करण्‍यात येत होती. यास पालकमंत्र्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी हरकत घेत देसाईसाहेब आल्‍यानंतर चर्चा करुन पुढील कारवाई करा, असे संबंधितांना सांगितले होते.

controversy between Chhatrapati Udayanaraj and Shambhuraj Desai

पोलिसांनी उदनयराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या पोवई नाक्यावरील कोयना दौलत या निवासस्थानाजवळ (Koyna Daulat Niwas) खासदार उदयनराजे यांची मालकी असलेल्या इमारतीवरील भिंतीवर सोमवारी रात्री क्रेनच्या साहाय्यानं पेटिंग काढण्याचे काम होणार होते. मात्र, सातारा पोलिसांनी हे पेटिंग काढण्यास विरोध करत संबंधित क्रेन आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना मज्जाव केल्यानं काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.