Share

‘माझ्या मुलाला सोडा, मला कोणी नाहीये…’, गृहमंत्री फडणवीसांविरोधात आईचा आक्रोश

Badlapur Rape Case Protestors 14 days judicial custody

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या ( Badlapur Rape Case ) घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील शाळा भाजपा आरएसएसशी संबंधीत आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

दोन चिमुकल्या मुलींना न्याय मिळावा या मागणीसाठी संपूर्ण बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते तर सोशल मीडियातुन आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला होता. आंदोलनानंतर तब्बल दोन हजारहून अधिक आंदोलनकर्त्यांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.

शाळेच्या बाहेर आणि बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱ्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला आताच्या आता फाशीची शिक्षा द्या. या मागणीसाठी आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडून बसले होते.

कल्याण कोर्टाबाहेर रोहित दिलीप घोलप या आंदोलकाच्या आईनं सरकार विरोधात हंबरडा फोडला,”त्याला बाप नाही, कोण नाही, मी एकटीच आहे. माझ्या मुलाला सोडा, मला कोणी नाही. रोहित आंदोलनात होता की नाही माहित नाही. माझ्या मुलाला सोडा… मला कोणी नाहीये, असे म्हणत आंदोलकाच्या आईनं कल्याण कोर्टाबाहेर महायुती सरकार विरोधात हंबरडा फोडला.

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार ( Badlapur Rape Case ) प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या मुख्य आरोपी अटक केली होती. आता आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बदलापूरमधील मुलींवर अत्याचाराचं प्रकरण समोर आल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Badlapur Rape Case | Protestors 14 days judicial custody

महत्वाच्या बातम्या

Badlapur Rape Case | Protestors 14 days judicial custody | बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱ्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Crime India Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now