Share

महाराष्ट्र बंदला परवानगी नाही, महाविकास आघाडीला झटका; गुणरत्न सदावर्तेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य

Maharashtra Bandh | Gunaratna Sadavarte vs Uddhav Thackeray Sharad Pawar | कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी

Published On: 

Maharashtra Bandh Gunaratna Sadavarte Uddhav Thackeray Sharad Pawar

🕒 1 min read

Badlapur Rape Case | बदलापूर आणि राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने २ ४  तारखेला महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली  होती. या ‘महाराष्ट्र बंद’ च्या विरोधात गुणरत्न सदावर्तें (Gunaratna Sadavarte) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. यावर तातडीची सुनावणी पार पडली.

मुंबई उच्च न्यायालयाने गुणरत्न सदावर्तेंची मागणी मान्य करत महाराष्ट्र बंदला परवानगी नाकारली आहे. “कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी”, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

बंदमुळे जनजीवन विस्कळीत होणार आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास होणार आहे. राजकीय पक्षांनी पुकारलेले बंद असंवैधानिक ठरवण्याचा हायकोर्टाला अधिकार आहे. सरकार असे बेकायदेशीर बंद रोखत नसेल तर कोर्टानं हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला.

संपूर्ण राज्याला वेठीस धरणं चुकीचं

सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणाऱ्या लोकांविरोधात सरकारने प्रतिबंधक पावले उचलली पाहिजेत. कोणालाही सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करण्याचा अधिकार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारने पार पाडलीच पाहिजे. कोणतंही विरोध प्रदर्शन हे कायदेशीरच मानलं पाहिजे.

बदलापुरातील ज्या घटनेतील आरोपीला फाशीच झाली पाहिजे. पण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचंय, त्यासाठी संपूर्ण राज्याला वेठीस धरणं चुकीचं आहे. लोकल ट्रेन, बससेवा, रस्ते कसे बंद करायचे याचं नियोजन केलं गेलंय. विरोध करण्याचा हा मार्ग राज्याच्या हिताचा नाही. यामुळे शाळा, महाविद्यालय, रूग्णालय यांना मोठा फटका बसेल.

दगडफेकीचे समर्थन कसं करणार? – गुणरत्न सदावर्तें

पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. दोषी पोलिसांवर सरकारनं कारवाई केली आहे. राज्य सरकारनं SIT स्थापन केली आहे.  मग हा बंद कशाला? बदलापूर मध्ये जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्याचा फोटो सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखवला. दगडफेकीचे समर्थन कसं करणार? असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे.

Gunaratna Sadavarte vs Uddhav Thackeray and Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही