Share

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव

Shivsena Uddhav Thackeray VS Eknath Shinde | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे. 

Published On: 

Shivsena Uddhav Thackeray VS Eknath Shinde

Mumbai | Shivsena | Uddhav Thackeray VS Eknath Shinde 

राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा खोटेपणा आम्हाला माहिती होता आणि आता तो जगजाहीर होत आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी पोलिसांकडून आंदोलकांवर सुरू असलेल्या कारवाईवरूनही संताप व्यक्त केला. 3-4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाले आणि त्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. 300 लोकांना आत टाकले, हा कुठला न्याय? या आंदोलकांची अशी परेड केली जणून त्यांनीच बलात्कार केला. देशात भाजपनेच अशी प्रथा पाडली आहे.

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Thackeray ) पक्षाच्या अधिकृत X अकॉउंट वरून Eknath Shinde यांच्यावर टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव , इतक्या संवेदनशील विषयावर तुम्ही खोटं कसे बोलू शकता? अशी विचारणा ठाकरे गटाकडून केली जात आहे.

सरकारला खरंच गांभीर्य आहे का? – Anil Deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही एकनाथ शिंदेंवर धारेवर धरले आहे. X वर पोस्ट करत म्हणाले, ”आपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं” हा महायुतीचा अजेंडा महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा बघायला मिळाला. मुख्यमंत्री महोदय, शासकीय कार्यक्रमातील जाहीर भाषणात हा इतका खोटारडेपणा कशासाठी ?राज्यात घडणाऱ्या संवेदनशील घटनांचे संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला खरंच गांभीर्य आहे का? असा सवाल Anil Deshmukh यांनी विचारला.

राज्याचा मुख्यमंत्री हा संशयी आत्मा – संजय राऊत ( Sanjay Raut )

राज्याचा मुख्यमंत्री हा संशयी आत्मा आहे. त्यांचा दिवसातील अर्धा दिवस हा संशयकल्लोळात, जादुटोणा, मंत्र-तंत्र, अंधश्रद्धा यात जातो. त्यामुळे त्यांना असा संशय येणे साहजिक आहे. बदलापुरात हजारो, लाखो लोक रस्त्यावर उतरले. या आंदोलकांवरही कोणीतरी जादुटोणा केला असावा असेही त्यांना वाटले असेल. कारण ते जादुटोणाप्रेमी आहेत, असा टोला राऊत ( Sanjay Raut ) यांनी लगावला

हे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. त्यांनी महाराष्ट्राला मूर्ख समजले आहे का? महाराष्ट्रात ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत. काल पुण्यात, अकोल्यात झाले. काय करताहेत मुख्यमंत्री, गृहमंत्री? असा जळजळीत सवालही राऊत यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही