Share

शिवरायांच्या काळातली ‘चौरंग’ शिक्षा पुन्हा आणण्याची गरज – रितेश देशमुख

Riteish Deshmukh Reacts on Badlapur Rape Case | Chhatrapati Shivaji Maharaj in his times gave the guilty what they deserved ‘Chaurang’ we need these laws back in action.

Published On: 

Riteish Deshmukh Reacts on Badlapur Rape Case

🕒 1 min read

Badlapur Riteish Deshmukh ।  महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात घडली आहे. आरोपींवर कारवाई करणे सोडून न्याय मागणाऱ्या आंदोलकांवर लाठी चार्ज केला गेला. यावर विरोधकांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोघांनी राजीनामा देऊन महाराष्ट्राची माफी मागावी. महायुती सरकारमध्ये घडत असलेल्या पापांचा पश्चात्ताप म्हणून तरी दोघांनी राजीनामा द्यावा आणि प्रायश्चित्त करावे.

या घटनेवर अभिनेता रितेश देशमुखने संताप व्यक्त केला आहे. X वर पोस्ट करत रितेश म्हणतोय,” “एक पालक म्हणून मला खूप चीड येतेय, मला वाईट देखील वाटतंय आणि रागही अनावर होतोय. चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरांइतकीच सुरक्षित जागा असायला हवी.

या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना शिक्षा देण्यासाठी जी ‘चौरंग’ शिक्षा वापरली, तीच शिक्षा आता पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे,” अशी पोस्ट रितेशने (Riteish Deshmukh ) केली आहे.”

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार ( Badlapur Rape Case ) प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या मुख्य आरोपी अटक केली होती. आता आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बदलापूरमधील मुलींवर अत्याचाराचं प्रकरण समोर आल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Riteish Deshmukh Reacts on Badlapur Rape Case

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही