Share

काँग्रेसची सत्ता असताना शिवसेनेच्या घरी कधीच ईडी सीबीआय आली नाही: उध्दव ठाकरे

Rajiv Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray | राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सर्वात जास्त ४१५ जागी विजय मिळवला पण त्यांना अहंकार नव्हता मात्र नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिला पण त्याला महाराष्ट्राने झटका दिला

Published On: 

Rajiv Gandhi Sharad Pawar Uddhav Thackeray 

मुंबई ।   Rajiv Gandhi । Sharad Pawar । Uddhav Thackeray 

राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सर्वात जास्त ४१५ जागी विजय मिळवला पण त्यांना अहंकार नव्हता मात्र नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिला पण त्याला महाराष्ट्राने झटका दिला. जेडीयू व तेलुगु देसमच्या दोन पायाचा टेकू घेऊन सरकार बनवावे लागले. मोदी सरकार अल्पमतातील सरकार आहे. नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी नाही तर हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करु पहात आहेत पण महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत त्यांना हिसका दाखवला, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

शरद पवार यावेळी म्हणाले की, मुंबई व काँग्रेस, मुंबई व राजीव गांधी यांचे वेगळे नाते आहे. राजीव गांधी यांचा देशाच्या उभारणीत मोठा वाटा आहे, देशाला नवी दिशा दिली आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना नेहरू-गांधी म्हटले काय होते माहित नाही, ज्यांनी देशासाठी सर्वस्व दिले त्यांच्याविषयी आकसाची भूमिका पंतप्रधान व त्यांचे सहकारी घेतात हे चुकीचे आहे. देशाला आधुनिकतेकडे कसे घेऊन जायचे याचा ध्यास राजीव गांधी यांनी घेतला होता. देश घडवण्यात नेहरू व गांधी कुटुंबाचे मोठे योगदान आहे,देशाच्या इतिहासातून नेहरु-गांधी कुटुंबाचे योगदान कोणीही पुसू शकणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेस पक्ष जास्त दिवस सत्तेत होता पण शिवसेनेशी कधीच सूडभावनेने वागला नाही. काँग्रेस सरकार असताना शिवसेना नेत्यांच्या घरी कधी ईडी, सीबीआय आली नाही. राजीव गांधी शिवसेनेशी कधीच सुडभावनेने वागले नाहीत पण भाजपा मात्र शिवसेनेला संपवायला निघाला आहे. राजीव गांधी सभ्य व सुसंस्कृत व्यक्ती होते.

राजीव गांधी यांनी कोणताही नारा न देता ४०० पार केले, एवढे बहुमत असतानाही राजीव गांधी यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करून पंचायत राज आणले. १९९४ साली भाजपा शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना, काँग्रेस पक्षाने आंदोलने केली तर त्यांच्यावर लाठी उगारायची नाही, असे स्पष्ट बजावले होते. विधानसभा निवडणुकीत आता भाजपाचा सुपडासाफ करायचा आहे. एकजूट व वज्रमुठ करून देशावरचे संकट दूर करू असे आवाहन ठाकरे यांनी केले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजीव गांधी यांच्या अकाली निधानाने देशाचा मोठा तोटा झाला, त्यांनी संगणक क्रांती आणली, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ३३ टक्के सत्तेचा वाटा दिला. राजीव गांधी यांनी खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण केले. राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोपही करण्यात आले पण ज्यांनी त्यांच्यावर हे आरोप केले त्यांच्याशीही त्यांनी सूडभावना बाळगली नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय महत्वाचा आहे, हा विजय हीच राजीव गांधी यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Rajiv Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही