Share

बदलापूर प्रकरणी भाजपप्रणित वकिलाकडून न्याय कसा मिळणार? संतप्त नागरिकांचा सवाल

Badlapur Rape Case । Ujjwal Nikam । Girish Mahajan । भाजप प्रवक्ते पदी ज्यांची नेमणूक आहे तेच राज्य सरकारचे विशेष वकील म्हणून काम कसे करणार? विश्वास कसा ठेवायचा? न्याय कसा देणार? ही नेमणूक चुकीची असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

Published On: 

Badlapur Rape Case | Ujjwal Nikam | Girish Mahajan

🕒 1 min read

Badlapur Rape Case | Ujjwal Nikam | Girish Mahajan

बदलापूरमध्ये एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येताच, राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास 12 तास उशिर केल्याने आंदोलक आक्रमक झाले. आज नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे रोको आंदोलन केले आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी घटनेप्रकरणी एसआयटी नेमल्याचे सांगितले, तसेच खटला फार्स्ट ट्रॅकमध्ये चालवणार असून उज्ज्वल निकम हा खटला चालवणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. बदलापुरात झालेल्या घटनेबद्दल जेवढा तुमच्या मनात राग आहे. तेवढा आमच्या मनातही आहे. चर्चेतून विषय सुटत असतो. इथे कुणाची लीडरशीप नाहीये असेही Girish Mahajan यांनी नमूद केले.

दरम्यान, आता यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.  बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam ) यांची विशेष सरकारी वकील म्हणून सरकारने नेमणूक केली. यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? भाजप प्रवक्ते पदी ज्यांची नेमणूक आहे तेच राज्य सरकारचे विशेष वकील म्हणून काम कसे करणार? न्याय कसा देणार? ही नेमणूक चुकीची असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

दरम्यान, ६  वाजता पोलिसांकडून आंदोलकांवर पळवून पळवून लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर काही आंदोलक जखमी झाले आहेत. आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावं, यासाठी वारंवार आवाहन करण्यात आलं होतं. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांकडून दगडफेक देखील झाली. पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे.

पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. आंदोलकांनी पोलिसांची गाडी उलटवत एका गाडीच्या काचा फोडल्या.

आंदोलकांचा Girish Mahajan यांना सवाल

“घटना 13 तारखेला झाली आहे. 13 तारखेपासून पोलिसांनी काय केलं?”, असा सवाल आंदोलकांनी गिरीश महाजन यांना केला. यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं.

“ज्या पोलिसांनी दिरंगाई केली, वेळकाढूपणा केला त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पीआयला आणि मुख्याध्यापकाला निलंबित केलं आहे. पोलिसांना सोडलं जाणार नाही. दोषी पोलिसांना आजच्या आज सस्पेंड केलं जाईल. तात्काळ आरोपीला फाशी देता येत नाही. असा कायदा नाही. तुमचा राग, संताप मान्य आहे. योग्य आहे. पण आरोपीला थेट फाशी देता येत नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.

“मुली बऱ्या आहेत. त्यांना कोणताही त्रास नाही. सीसीटीव्ही फुटेज वापरले जात आहे. आमच्या ताब्यात द्या मारून टाकतो, असं म्हणत आहेत. पण कायद्याने तसं करता येत नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

Badlapur Rape Case | Ujjwal Nikam | Marathi News

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही