Share

भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बदलापूर घटनेवर किळसवाण्या टिपण्या; भाजपची सवेंदनशीलता संपली का?

Jitendra Awhad Vs BJP Badlapur School Case

Published On: 

Jitendra Awhad Vs BJP Badlapur School Case

🕒 1 min read

Jitendra Awhad Vs BJP | बदलापूरमध्ये एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येताच, राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरमधील नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारला धारेवर धरत, कडाडून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर हल्लाबोल करत, ‘लाडक्या बहिणीं’च्या छोट्या मुलीही असुरक्षित असल्याचा खोचक टोला ठाकरे यांनी लगावला आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवरकेलं संताप व्यक्त करत म्हणाले की,” महिलांविरोधात घडत असलेल्या घटनांवरून जबाबदारी झटकत आपले सत्ताधारी फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यात मग्न असल्याची टीका आव्हाडांनी ( Jitendra Awhad ) केली.

ही टीका भाजपच्या कार्यकर्त्यांना अतिशय जिव्हारी लागल्याचे दिसून आले. भाजपकडून अतिशय किळसवाणी प्रकारे भाजपच्या बचाव करण्यासाठी हे कार्यकर्ते उतरले आहेत.

Jitendra Awhad यांची X वरील पोस्ट Vs BJP

आपल्या ४ वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार तिच्या तोंडून ऐकणं आणि गुन्ह्याची नोंद करण्यासाठी १२ तास वाट बघावी लागणं, पालकांसाठी याहून मोठं दुःख काय असू शकतं..? बदलापूरमध्ये घडलेला प्रकार प्रचंड वेदनादायी आहे, आणि त्याहून जास्त पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईचा संताप..!

हल्ली समोर येत असलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांची भूमिका पाहून खरं तर आश्चर्य वाटतं आणि डोक्यात सणक जाते. आपलं पोलिस प्रशासन इतकं बेजबाबदारपणे कसं वागू शकतं? मग याचा संताप होऊन लोक का नाही शहर बंद करणार? महिलांविरोधात घडत असलेल्या घटनांवरून जबाबदारी झटकत आपले सत्ताधारी फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यात मग्न आहेत.

फक्त आपली पोळी भाजण्यासाठी प्रशासनाचा वापर केला जातोय. पण सशक्त आणि सक्षम धोरण आणून ते राबवण्याची या सरकारची कुवत नाहीये. मोठा भाऊ म्हणत आलेल्या केंद्र सरकारकडून यांनी अजून महाराष्ट्र शक्ती विधेयकही मंजूर करून घेतलं नाहीये. माझी महामहिम मुर्मू जी यांना विनंती आहे, की महाराष्ट्र शक्ती विधेयकाला संमती मिळवून द्यावी, जेणेकरून महिलांविरोधातील गुन्ह्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल, आणि राज्यात व देशात अशा गुन्ह्यांविरोधात एक उदाहारण सादर होईल.

यावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून किळसवाणी टिपण्या समोर येत आहे. एकीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या गंभीर घटनेचे राजकारण करू नका असा सल्ला विरोधकांना देत आहेत, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारच्या टिपण्या येत असेल तर भाजप कार्यकर्त्यांची सवेंदनशीलता संपली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Badlapur school case news
Badlapur school case news

जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय; एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याची वादग्रस्त टिप्पणी!

“तू अशा बातम्या देत आहेस जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय”, एकनाथ शिंदे गटाच्या वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकारावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. म्हात्रे यांचा निषेध व्यक्त होत असून पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत

बदलापूरची शाळा भाजपसंबंधीत – उद्धव ठाकरे

बदलापूरची शाळा भाजपसंबंधीत आहे. मला राजकारण करायचे नाही. मी यामध्ये राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी कोणी राजकारण करु नये, तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला, तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!