🕒 1 min read
Praniti Shinde vs Devendra Fadnavis । ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar ) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तेंव्हा विरोधकांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांना प्रत्युत्तर देताना, गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. याच वक्तव्याचा आधार घेत विरोधक आणि तरुण कार्यकर्त्यांकडून गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’ गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झालाय. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे गप्पा मारता आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येत आहे.
युवा कार्यकर्ता प्रतीक पाटील X पोस्टवर लिहतात, ”स्टेटमेंट जुनं आहे. पण, अशी निर्दयी मानसिकता असणारा माणूस गृहखाते बुडाखाली घेऊन बसलेला आहे. महिलांवरचे अत्याचार कसे कमी होणार? अक्षता म्हात्रे, यशश्री शिंदे आता बदलापूर? या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा, राजकीय कुरघोडीकर नव्हे…
Adv Anand Dasa X पोस्टवर लिहतात “गाडीखाली कुत्र आलं तरी विरोधक गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील” असं फडणवीस एकदा म्हणाले होते.बदलापूर च्या संतप्त घटनेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झालाय. पालकांना शाळेवर मोर्चा काढावा लागला, रेल्वे थांबवावी लागली. मग सरकार जाग झालं.
यात आम्ही तुमचा राजीनामा मागू शकतो का? कारण मीही मुलींचा बाप आहे. तुम्ही राजीनामा देऊन टाका. महिला सुरक्षित नाहीत. तुमच्याकडून गृहखात सांभाळणं शक्य नाही.
Devendra Fadnavis यांनी राजीनामा द्यावा – Praniti Shinde
“बदलापूरमध्ये जे घडलं आहे ते भयंकर आहे. चार वर्षाच्या मुलीवर या प्रकारचा अत्याचार होतं असेल तर समाज म्हणून आपल्याला मान खाली करण्याची वेळ आली आहे. एफआयआर दाखल करायला चार दिवस लागतात. गुजरात सारख्या ठिकाणी बलात्कार करणाऱ्या लोकांचा सत्कार केला जातो, तेव्हा समाजात काय संदेश जाणार आहे? आता समाजाने ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे का? राज्यकर्ते आणि प्रशासनावर आता काही भरोसा राहिला नाही, त्यांच्यावर अवलंबून राहून काही होणार आहे. रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करायला पाहिजे, तेच आता बदलापूरात दिसत आहे. गृहमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे, असं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
Badlapur Rape Case | Home Minister Resign
महत्वाच्या बातम्या
- बदलापूर प्रकरणी भाजपप्रणित वकिलाकडून न्याय कसा मिळणार? संतप्त नागरिकांचा सवाल
- तुझ्यावरच बलात्कार झालाय; एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याची महिला पत्रकारांवर वादग्रस्त टिप्पणी!
- भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बदलापूर घटनेवर किळसवाण्या टिपण्या; भाजपची सवेंदनशीलता संपली का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












