Ashish Deshmukh | नागपूर: काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. आशिष देशमुख यांचं यापूर्वी काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. आशिष देशमुख यांना येत्या निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Ashish Deshmukh expelled from Congress
गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या भेटीस गेले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर आशिष देशमुख यांची सहा वर्षासाठी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
“उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या आमदारांवर अपात्रतेची वेळ येऊ देणार नाही. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे आणि महाविकास आघाडी तुटणार आहे”, असा दावा आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे.
दरम्यान, आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Bhagwant Mann | राज्यभवन भाजपचं हेडऑफिस तर भाजप नेते अधिकारी – भगवंत मान
- MS Dhoni | जगात भारी ‘Thala’ ची एन्ट्री! DJ झेननी सांगितला अवाक करणारा किस्सा
- Rahul Gandhi | “… हा देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे”; राहुल गांधींचं ट्विट चर्चेत
- Sanjay Shirsat | आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भ्रष्टाचार; संजय शिरसाटांचा ठाकरेंवर आरोप
- IPL 2023 | 1 डॉट बॉल 500 झाडं! Tata चा आयपीएलच्या माध्यमातून मोठा उपक्रम