Anil Parab | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थिती त्या शिंदे गटात सामील झाल्या. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गट शिंदे गटावर टीका करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Neelam Gorhe has been given full support by Shivsena – Anil Parab
अनिल परब (Anil Parab) म्हणाले, “नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेनं भरभरून दिलं आहे. मात्र त्या आता शिवसेनेवर टीका करत आहे. शिवसेनेनं त्यांना चार वेळा विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्याचबरोबर विधान परिषदेचे उपसभापती पद दिले. त्यांनी शिवसेनेच्या जोरावर आत्तापर्यंत अनेक पदं भोगली आहे.”
पुढे बोलताना ते (Anil Parab) म्हणाले, “अनेक लोकांनी पक्ष सोडला आहे. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाईट दिवसांमध्ये अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहे आहेत. जाणारे पक्षावर वार करून गेले आहेत. फक्त त्यांची अवस्था ना इकडची न तिकडची अशी होऊ नये.”
दरम्यान, ठाकरे गटात सुषमा अंधारे (Sushma Andhare) आल्यामुळे गटातील महिला नेत्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांमुळे तुम्ही ठाकरे गट (Anil Parab) सोडून शिंदे गटात आला का? या प्रश्नाचे उत्तर देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “पक्षात सटरफटर लोकं आल्यानं आम्ही नाराज होत नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Mahesh Manjrekar | “माझ्या मुलानं सांगितलं तो ‘गे’ आहे तर…”; महेश मांजरेकरांचं खळबळजनक वक्तव्य
- Neelam Gorhe | “सटरफटर लोकांमुळे नाराज…”; नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारेंवर घणाघात
- Neelam Gorhe | ठाकरे गटाला रामराम ठोकत नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटात प्रवेश
- Chitra Wagh | कसं काय जमतं बुवा स्वतःलाच खोटा दिलासा देणं? चित्रा वाघांचा संजय राऊतांना सवाल
- Pankaja Munde | “… तर हा देखील मोठा गुन्हा आहे”; पंकजा मुंडेंचा देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला