Neelam Gorhe | ठाकरे गटाला रामराम ठोकत नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटात प्रवेश

Neelam Gorhe | मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज सकाळपासूनच त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “नीलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशानंतर पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युती किती मजबूत आहे, हे सिद्ध झालं. बाळासाहेब ठाकरे ,अटलजी यांच्या विचारांनी बनलेली ही युती आहे. राज्यामध्ये या युतीचं सरकार स्थापन व्हावं हीच जनतेची देखील इच्छा आहे.”

The Shinde group is taking Hindutva forward – Neelam Gorhe

पक्षप्रवेशानंतर नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मी 1998 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट योग्य मार्गावर जात आहे. त्याचबरोबर शिंदे गट हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहे. म्हणून मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.”

दरम्यान, नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या पक्षप्रवेशानंतर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊत (Sanjay Raut)  यांना सुनावलं आहे. “‘उठा’ठेवी करणाऱ्यांचा आणखी एक गडी आऊट..! दिवसेंदिवस पक्षाला गळती लागत असतानाही, शिंदे गटाचे १७-१८ आमदार आमच्या संपर्कात असल्याच्या फुशारक्या मारणाऱ्या सर्वज्ञानींच्या कॉन्फिडन्सला दादच द्यायला हवी.. संजय राऊत यांना कसं काय जमतं बुवा स्वतःलाच खोटा दिलासा देणं..?”, असं चित्र वाघ यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.