Mahesh Manjrekar | मुंबई: सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. सध्या महेश मांजरेकर त्यांच्या एका वक्तव्य मुळे चर्चेत आले आहे. मांजरेकर यांनी त्यांच्या मुलाबाबत खळबळजनक विधान केलं आहे. या विधानानंतर चर्चांना उधाण आलं आहे.
Would Marathi people like to watch gay movies?
महेश मांजरेकर यांनी समलिंगी संबंधावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठी लोकांना समलैंगिक विषयावर चित्रपट बघायला आवडेल का? या प्रश्नाचे उत्तर देत महेश मांजरेकर म्हणाले, “मराठी प्रेक्षक हुशार, पुरोगामी आणि समजूतदार आहे. आपण त्यांना कमी का लेखतो? त्याचबरोबर मराठी चित्रपटांमध्ये असे प्रयोग आधी करण्यात आले आहे. म्हणून मराठी प्रेक्षक अशा प्रकारचे चित्रपट बघू शकतात असं मला वाटतं.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “लोक समलिंगी नातेसंबंध स्वीकारत नाही. त्यामुळे आत्महत्येसारखे प्रकार घडून येतात. आपण प्रत्येक नातेसंबंध स्वीकारून त्याचा आदर करायला पाहिजे. मला जर माझा मुलगा येऊन म्हणाला की तो ‘गे’ आहे तर मी त्याचा आनंदाने स्वीकार करेल.”
दरम्यान, “वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर (Satya Manjrekar) दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर सत्या मांजरेकर यांच्या दिसण्यावरून टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता महेश मांजरेकर यांनी दिलेल्या या वक्तव्यानंतर चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Neelam Gorhe | “सटरफटर लोकांमुळे नाराज…”; नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारेंवर घणाघात
- Neelam Gorhe | ठाकरे गटाला रामराम ठोकत नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटात प्रवेश
- Chitra Wagh | कसं काय जमतं बुवा स्वतःलाच खोटा दिलासा देणं? चित्रा वाघांचा संजय राऊतांना सवाल
- Pankaja Munde | “… तर हा देखील मोठा गुन्हा आहे”; पंकजा मुंडेंचा देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
- Ajit Pawar | दगाबाजी! शरद पवारांना समर्थन करणारे आमदार अजित पवारांसोबत