Amol Kolhe | अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?? नागपुरात शिट्टी वाजवून केला बंडखोराचा उमेदवाराचा प्रचार??

Amol Kolhe | पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील रणधुमाळी महायुती आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर निर्णायक क्षणी म्हणजे मतदानाच्या एक दिवस अगोदर एक व्हिडीओ व्हायरल झाला. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या शिट्टी या चिन्हाचा अप्रत्यक्ष प्रचार केल्याचा म्हटले जात आहे. मात्र, हा व्हिडीओ नागपूर किंवा अमरावती येथील कार्यक्रमांचा असून, तो कोणीतरी एडिट करून व्हायरल केल्याची माहिती खासदार कोल्हे यांच्या स्वीय सहायकाने दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे शिवसेनेचे पिंपरी महापालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला. शिट्टी हे चिन्ह घेऊन ते पोटनिवडणुकीत उतरले.

Amol Kolhe campaigned for Rahul Kalate

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नागपूरमध्ये शिट्टी वाजवल्याने त्याचे पडसाद थेट चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत उमटले. अमोल कोल्हे यांनी शिट्टी फुंकत त्यांचे घनिष्ठ मित्र आणि महाविकासआघाडीचे बंडकोर नेते राहुल कलाटे यांचाच अप्रत्यक्षपणे प्रचार केल्याची चर्चा रंगली. इतकंच नाही तर आता अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं. शिट्टी वाजवल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता थेट अमोल कोल्हे यांनीच भाष्य केलं.

अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण

“मी केलेलं भाषण सार्वजनिक मंचावर आहे. नागपूरमध्ये शिवशाही महोत्सवात संविधान जागर या विषयावर बोलताना कोणत्याही कायद्याचा वापर कसा होतो यांचं मी उदाहरण दिलं होतं. ते भाषण एडिट करून माझ्या ‘क्लिप्स’ तयार करण्यात आल्या. त्यामुळे त्याचा अन्वयार्थ काढणं योग्य नाही.”, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

“माझं भाषण काळजीपूर्वक बघितलं तर मी एक उदाहरण देण्यासाठी त्या कार्यकर्त्याला बोलावलं. त्या कार्यकर्त्याच्या गळ्यात शिट्टी होती. तो कार्यकर्ता नागपूरमधील कार्यकर्ता होता. त्यामुळे मला वाटतं हा एक योगायोग असू शकतो. त्यामुळे त्याचे असे अर्थ काढू नये. मला राहुल कलाटेंना पाठिंबा द्यायचा असता तर मी प्रचाराला गेलो असतो,” असं मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नागपूरच्या कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी राहुल कलाटे यांचे प्रचारचिन्ह शिट्टी फुंकून कलाटे यांचा अप्रत्यक्षपणे प्रचार केल्याची चर्चा चिंचवड मतदारसंघात सुरू आहे. या प्रचारामुळे अमोल कोल्हेंच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.