गद्दार लोकांना नाक अन् तोंडही नसतं, हिंमत असेल तर…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ambadas Danve । Kolhapur । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा देत म्हणाले होते की, ”या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत. या दाढीने तुमच्या सत्तेचं काय केलं जगाला माहीत आहे, असा इशारा शिंदे यांनी दिला होता.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, बाळासाहेब भूमिका घेतल्यावर ते बदलत नव्हते मात्र हे (Uddhav Thackeray) सतत भूमिका बदलत असतात. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन काम करतो. सतत आमच्या कृतीवर टीका होते. मनातील जळफळात का आहे. आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आम्ही मुख्यमंत्री झालो तर सहन होत नाही का? असा सवाल एकनाथ शिंदेनी ठाकरेंना केला.

यावर आता  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले,”उद्धव ठाकरे यांना इशारा देण्याची धमक एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटात नाही. त्यांना इशारा द्यायचा असता तर ते समोरासमोर येऊन बोलले असते.

Ambadas Danve comment on Eknath Shinde

गद्दार लोकांना नाक नसतं आणि तोंडही नसतं. आज देशाची आर्थिक स्थिती काय आहे हे त्यांनी पाहावं. मागच्या एक वर्षात अमृत काळाचा एक थेंब देखील पडला आहे का? हे त्यांनी विचार करावा, असं म्हणत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

अंबादास दानवे कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज अंबाबाई मंदिरात जात दर्शन घेतलं. यावेळी अंबाबाई ही शक्ती देवता आहे आणि ऊर्जेची देवता आहे.

शिवसेना आणि शिवसैनिकाला ऊर्जा प्राप्त होऊन या महाराष्ट्रात महिषासुराच्या अवलाद जन्मले आहेत. त्यांचं निर्धालन करण्याची शक्ती आमच्या मनामध्ये द्यावी, अशी अंबाबाईची चरणी प्रार्थना केली आहे, असं दानवे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या