संधी साधू लोक म्हणत अजित पवारांवर Nitin Gadkari यांची टीका?

Nitin Gadkari comment on ajit pawar

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitin Gadkari । दिल्ली । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासदारांना त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार देण्यासाठी एका कार्यक्रमात गेले होते. कार्यक्रमात गडकरी यांनी विचारसरणीची घसरण आणि नेत्यांचा संधि साधू पणा यावर टीका केली आहे.

सत्ताधारी पक्षाशी संबंध ठेवण्याच्या इच्छेवर चिंता व्यक्त करत विचारधारेचा ऱ्हास होणे ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नसल्याचे गडकरी म्हणाले आहेत. महाराष्ट्रच्या राजकारणात ज्या घटना घडत आहे त्याला अनुसरून गडकरी यांनी हे व्यक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

“आपल्या विचारसरणीच्या जोरावर ठामपणे उभे राहणारे लोक आहेत, मात्र अशा लोकांची संख्या कमी होत आहे. विचारसरणीची घसरण लोकशाहीसाठी चांगली नाही.

Ideological decline is not good for democracy – Nitin Gadkari

ना उजव्या विचारसरणीचे, ना डाव्या पक्षाचे, आम्ही प्रसिद्ध संधिसाधू आहोत, असे काही लोक लिहितात आणि सर्वांना सत्ताधारी पक्षाशी जोडले जावेसे वाटते.” असेही गडकरी म्हणाले.

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ” ”मी नेहमी गमतीने म्हणतो की, सत्तेत कोणताही पक्ष असो, एक गोष्ट निश्चित आहे की, चांगले काम करणाऱ्याला कधीच सन्मान मिळत नाही आणि जो वाईट काम करतो त्याला कधीही शिक्षा होत नाही.

राजकारणी येतात आणि जातात पण त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील लोकांसाठी केलेले काम शेवटी महत्त्वाचे असते आणि चांगले काम केलेल्या त्याच लोक प्रतिनिधींना आदर मिळतो.

महत्वाच्या बातम्या