कितीही करा तरीही फणा काढतातच, पण मी बी पक्का गारुडी! Vasant More यांच्या स्टेट्सने पुण्यात खळबळ

Vasant More WhatsApp Status vs Sharmila Thackeray, Sainath Babar । Pune Lok Sabha Election

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vasant More । लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी लवकरच सुरु होणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्ते यांनी पक्ष बांधणीला सुरवात केली आहे.

सर्वच पक्षात लोकसभेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. तसेच चित्र पुण्यातही बघायला मिळत आहे.

मनसे कडून पुण्यात साईनाथ बाबर आणि वसंत मोरे दोघेही लोकसभेच्या उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना पुणे लोकसभा (Pune Lok Sabha Election) खासदारकीचे संकेत दिले आहे.

काही दिवसांपूर्वी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनीच वसंतला मला दिल्लीला पहायचं आहे, असे म्हटले होते. यावर आता वसंत मोरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Vasant More WhatsApp Status vs Sharmila Thackeray, Sainath Babar

वसंत मोरे यांनी व्हाट्सॲप स्टेट्स ठेवत म्हणाले की, “कुणासाठी कितीबी करा वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार.”

मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी व्हाट्सॲप स्टेट्स ठेवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी साईनाथ बाबर (Sainath Babar ) आणि वसंत मोरे यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याचे स्पष्ट होते.

महत्वाच्या बातम्या