काका-पुतणे बिनडोक, Jitendra Awhad चलाख म्हणत नेटकऱ्यांनी उडवली अजित पवार गटाची खिल्ली

Suraj Chavan vs Jitendra Awhad

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Suraj Chavan vs Jitendra Awhad। पुणे । निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिले आहे. यावर अजित पवार समर्थक जल्लोष करत आहेत तर विरोधकांकडून अजित पवार आणि भाजपवर टीका केली जात आहे.

शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. ”जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा #सूर्याजी_पिसाळ” अशी पोस्ट करत आव्हाडांनी अजित पवारांना डिवचले होते.

यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, ”तुमच्या सारखे नारद तिथे असल्यावर काका-पुतणे कसे एक राहतील ..” असे उत्तर चव्हाण यांनी आव्हाडांना दिले.

Suraj Chavan vs Jitendra Awhad 

सुरज चव्हाण यांनी आव्हाडांना नारद म्हंटल्यानंतर यावर नेटकर्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. 

दाणेश जैन लिहितात, ”म्हणजे काका पुतणे ते पण पवार बिनडोक आहेत आणि @Awhadspeaks चलाख आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला ?” असा सवाल जैन यांनी सूरज चव्हाण यांना विचारला आहे.

तर वैभव वेताळ पाटील लिहितात,”तुझं पोरग पण तुला उद्या तूच बांधलेल्या घरातून बाहेर काढेल तेव्हाही असच म्हणशील का ?”

अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे. यावर आता जितेंद्र आव्हाड काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Suraj Chavan vs Jitendra Awhad काका-पुतणे बिनडोक, जितेंद्र आव्हाड चलाख म्हणत नेटकऱ्यांनी उडवली अजित पवार गटाची खिल्ली

महत्वाच्या बातम्या