Pune NCP | राष्ट्रवादी कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढतांना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

Pune NCP Ajit Pawar VS Sharad Pawar

Pune NCP – निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर आता कार्यालये ताब्यात घेण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.

अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी म्हणाले,”‘राष्ट्रवादी पक्ष कार्यालये ताब्यात घेण्याबाबत अजून आदेश नाहीत. वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की, लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ. सध्या पक्ष चिन्ह आम्हाला मिळालं, त्यामुळं पक्ष कार्यालयं आमच्या बाजूला येईल.’

तर पुण्यात शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुण्यातील कार्यालयावरील घड्याळ चिन्ह हटवलं. यावेळी कार्यालयावरील चिन्ह काढताना जगताप यांना अश्रु अनावर झाले.

जगताप यांनी त्यांच्या गाडीवरील घड्याळ चिन्ह सुद्धा काढून टाकले आहे. 24 वर्षापासून कार्यालय पाहत असताना हे दिवस येतील, असे वाटलं नव्हतं, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.

Pune NCP Ajit Pawar VS Sharad Pawar

दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चिन्ह काढून टाकताना अजित पवारांच्या नावाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर काही वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर तणाव निर्माण झाला होता. अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील याठिकाणी पोहोचले आहेत.

दरम्यान शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) हे नाव दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.