Share

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा ११ वा दिवस; फडणवीस आणि विखे पाटलांची सर्वात मोठी घोषणा

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज ११ वा दिवस असून, फडणवीस आणि विखे पाटलांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Published On: 

Maratha Reservation CM Fadnavis on Manoj Jarange protest

Maratha Reservation: राज्याच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस असून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर उभे राहिले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, असा स्पष्ट इशारा जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळेच आता सरकारची पुढची भूमिका काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारने आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या सर्व मागण्या मान्य करण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे. पण दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. आता सरकारचे कोणतेही शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर अत्यंत रोखठोक भाष्य केले. आजवर मराठा समाजाला जे काही दिले ते आम्हीच दिले असून यापुढेही आम्हीच न्याय देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणाच्याही ताटातले काढून दुसऱ्याला दिले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. जे संविधानात आणि न्यायालयाच्या अधीन असेल ते नक्की दिले जाईल, अशी हमी त्यांनी दिली.

दुसरीकडे सोमवारी मध्यरात्री प्रसाद लाड आणि उदय सामंत यांनी फोनवर संवाद साधल्यानंतर जरांगे यांनी वैद्यकीय उपचार पुन्हा सुरू केले होते. त्यामुळे आज शिष्टमंडळ भेटीला जाईल अशी चर्चा होती.

मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. जरांगे पाटील अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असतील तर तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, असे विखे पाटील म्हणाले. तरीही सरकारकडून हा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही