Maratha Reservation : आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. या सात दिवसांत अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. परिणामी, मराठा आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहेत.
जरांगे यांच्या समर्थनार्थ आंदोलकांनी रास्ता रोको, निदर्शने आणि आंदोलने सुरू केली असून अनेक जिल्ह्यांमध्ये ‘बंद’ची हाक देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, मराठा समाजाने एक प्रमुख मागणी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनीच्या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा.
Manoj Jarange Maratha Reservation protest
जर विखे पाटील यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडे घातले आहे.
मराठा समन्वयक करण गायकर यांनी एका पत्रकार परिषदेत ही मागणी केली आणि त्यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खोटारडेपणाचाही पर्दाफाश केला. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असलेले विखे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, ‘सारथी’ (SARTHI), मराठा विद्यार्थ्यांसाठीची वसतिगृहे किंवा एस.सी.बी.सी. (SCBC) आरक्षण यांबाबत त्यांनी एकही बैठक घेतलेली नाही. ते ना मराठा समाजाशी संवाद साधतात, ना बैठका घेतात. तसेच समाजाच्या हितासाठी नेमकी काय कार्यवाही केली जात आहे, याची माहितीही ते देत नाहीत.
त्यामुळे, समाजाची दिशाभूल केल्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण गायकर यांनी केली आहे. तसेच, त्यांनी राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यांना या पदावरून हटवावे, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबईत बैठक घेऊन रणनीती ठरवणार
SCBC आरक्षणाच्या संरक्षणासाठी काहीही केले जात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ८ तारखेला मुंबईत मराठा समाजाची बैठक आयोजित केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
आपला आणि जरांगे यांचा लढा एकच असल्याचे गायकर यांनी नमूद केले. जरांगे हे मराठवाड्यातील मराठा समाजासाठी लढा देत असतानाच, इतर भागांतील समाजालाही विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
जरांगेंनी नकार दिला
दरम्यान, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “काल आम्ही सरकार म्हणून जरांगेंची भेट घेतली. त्यांच्या अभ्यासाकांसोबत देखील तीन तास आम्ही चर्चा केली. मनोज जरांगे यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली.” असे जरांगे यांनी सांगितले.
“जरांगे यांच्या तब्येतीची परिस्थिती बघता ते उपोषण सोडतील अशी आम्हाला अपेक्षा होती. आम्ही त्यांना उपोषण सोडण्याचे नाही तर स्थगित करण्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी स्पष्टपणे त्याला नकार दिला,” अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली.
पुढे प्रसाद लाड यांनी सांगितले की, “दोन दिवसांपूर्वी झालेल्या भेटीत त्यांनी पाणी घेतले. औषधोपचार घेण्याची मागणी देखील त्यांनी आमची मान्य केली. यामुळे त्यांच्या तब्येतीची काळजी आता तरी आम्हाला नाही. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संपूर्ण मराठवाड्यात जी अस्थिरता आहे, ती कुठेतरी संपावी,”
“आमच्या शब्दाचा त्यांनी मान ठेवावा ही विनंती मी मनोज जरांगे यांना करतो. आज सकाळी मी त्यांना निरोप पाठवला, त्यांनी सांगितले आहे की, एक-दोन दिवसात मी पुन्हा अभ्यासकांशी चर्चा करेल. तुम्ही जे जे निर्णय घेतले ते कागदावर मला पाठवा. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही ते निर्णय त्यांना पाठवण्याचा प्रयत्न करू. ही कोंडी कशी सुटेल यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे,” असे लाड म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- शरद पवार गटाला खिंडार; ११ नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
- ‘फडणवीस दिल्लीत जाणार, सर्वोच्चपदी विराजमान होणार’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
- ISRO EOS-05 Launch: भारताची सीमेवर 24 तास पाळत; चीन-पाकिस्तानवर बारीक नजर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











