मुंबई : जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले, तेव्हा पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली. या बंडामुळे शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडली आणि पक्षाचे दोन गट तयार झाले, शिंदे गट (Shinde Gat) आणि ठाकरे गट (Thackeray Gat). त्यानंतर, निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. ठाकरे गटाने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले असून, सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) हे शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने युक्तिवाद करत आहेत.
सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, विधान परिषदेत क्रॉस-व्होटिंग (Cross Voting) झाले, तेव्हाच हे आमदार सुरतला गेले होते. त्यानंतर सुरतहून गुवाहाटीला (Guwahati) जाणे हा काही योगायोग नव्हता. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले, त्याचवेळी ही हालचाल झाली. सिब्बल यांनी यावर भर दिला की, विधिमंडळातील पदे वाटप करण्याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असतो आणि बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले होते.
Kapil Sibal arguing Symbol Case in SC against Eknath Shinde
शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपने बंडखोरांचे स्वागत का केले?, असा प्रश्नही सिबल यांनी उपस्थित केला. कारण हे आमदार भाजपचे किंवा त्यांच्या मित्रपक्षांचे नव्हते. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, सरकार स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे भाजप आमदारांसोबत राज्यपालांना भेटले होते आणि त्यांना बहुमत चाचणी (फ्लोअर टेस्ट) घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
सिब्बल यांनी पुढे नमूद केले की, अपात्रतेच्या कारवाईबाबतचा अधिकार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे होता. तसेच, अनिल देसाई यांनी पक्षाविरोधी कारवायांचा आरोप करणारे पत्र निवडणूक आयोगाला सादर केले होते आणि त्यावेळी न्यायालयाने आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ दिली होती, असेही त्यांनी सांगितले.
सुरुवातीला ३१ आमदार गुवाहाटीला गेले होते आणि नंतर ही संख्या ३९ पर्यंत वाढली. सुरुवातीला त्यांना यश मिळेल की नाही याची खात्री नव्हती, परंतु कालांतराने हा गट ३१ वरून ३९ पर्यंत पोहोचला. सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, त्यांना जाणीव झाली होती की सरकार स्थापन होत आहे, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकला जाऊ शकत होता आणि येथे असा प्रभाव खरोखरच टाकला गेला होता, हे स्पष्ट आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर RBI मध्ये सरकारी नोकरीवर; पगार ऐकून थक्क व्हाल!
- किशोरी पेडणेकरांचा पलटवार; ‘टेंडर मागे घेण्यावरून तुमची बालबुद्धी दिसते’
- एकनाथ शिंदेंचे मोठे आदेश; सिद्धिविनायक मंदिराच्या देणग्यांचे विशेष ऑडिट होणार













