Share

सर्व सामान्य लोकांना काढू देता का असे फोटो?, प्राजक्ता माळीच्या दर्शनावरून नवा वाद; चाहत्यांचा थेट प्रशासनालाच सवाल!

प्राजक्ता माळीच्या तुळजाभवानी दर्शनाच्या फोटोंवरून नेटकरी संतापले. सर्वसामान्यांना एक आणि सेलिब्रिटींना दुसरा नियम का? असा सवाल विचारला जातोय.

Published On: 

Prajakta Mali taking darshan of Goddess Tulja Bhavani inside temple

मंदिरात गाभाऱ्यात फोटो काढायला बंदी असते ना? मग सेलिब्रिटींना हे नियम का लागू होत नाहीत? अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) ताज्या फोटोंवरून सध्या सोशल मीडियावर असाच मोठा राडा सुरू झालाय.

प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत असते. नुकतंच तिने आई तुळजाभवानीच्या दर्शनाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पारंपरिक वेशभूषेत देवीचं दर्शन घेताना ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षावही केला. पण दुसरीकडे, याच फोटोंवरून आता एक नवा वाद पेटलाय.

Prajakta Mali Tulja Bhavani 

सर्वसामान्य भाविकांना देवीसमोर साधं डोकंही नीट टेकवू दिलं जात नाही. तिथे फोटो काढणं तर खूपच लांबची गोष्ट! मग प्राजक्ताला मंदिरात फोटो काढण्याची विशेष परवानगी कोणी दिली? असा थेट सवाल अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय. ‘सामान्यांना एक नियम आणि कलाकारांना व्हीआयपी ट्रिटमेंट का?’ अशा संतप्त प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये उमटत आहेत.

काही चाहत्यांनी तर थेट मंदिर प्रशासनालाच धारेवर धरलंय. देवाच्या दारी सगळे समान असतात. त्यामुळे मंदिरातील नियम सर्वांसाठी सारखेच हवेत आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या वाढत्या वादानंतर आता मंदिर प्रशासन किंवा स्वतः प्राजक्ता याबाबत काही स्पष्टीकरण देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही