Share

ई-२० पेट्रोलवरून गडकरी रडारवर; नागपुरात अचानक एवढा भडका का उडाला?

ई-२० पेट्रोलमुळे गाड्या खराब होत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसचा नागपुरात जनआक्रोश मोर्चा. नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड.

Published On: 

Nitin Gadkari Nagpur protest youth congress E20 petrol issue

धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता थेट नितीन गडकरी (Nitin Gadkari) रडारवर आलेत का? ई-२० पेट्रोलच्या (E20 Petrol) मुद्यावरून नागपुरात अचानक एवढा भडका का उडाला?

नीट पेपरफुटीवरून नुकतंच सरकारला बॅकफूटवर जावं लागलं होतं. आता इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून नवा वाद पेटला आहे. युवक काँग्रेसने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याविरोधात एल्गार पुकारलाय. नागपुरात त्यांच्या निवासस्थानाबाहेर आज जोरदार राडा झाला.

Nitin Gadkari Nagpur Protest 

सोशल मीडियावर E20 पेट्रोलविरोधात आधीच संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच नागपूर युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत जनआक्रोश मोर्चा काढला. दुपारी एक वाजता चिटणीस पार्क चौकातून निघालेला हा मोर्चा थेट गडकरींच्या घराकडे धडकला. कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचं वातावरण होतं.

“इथेनॉल मिश्रित इंधनात मोठा भ्रष्टाचार झालाय. गोरगरिबांच्या गाड्या खराब होत आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी तातडीने राजीनामा द्यावा,” अशी मागणी एका आंदोलकाने केली. कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी आणि वाढता विरोध पाहता पोलिसांनी तातडीने सूत्रं फिरवली.

कडक बंदोबस्त तैनात करत पोलिसांनी अनेक आक्रमक कार्यकर्त्यांची धरपकड केली. थोडक्यात सांगायचं तर, ई-२० पेट्रोलच्या या नव्या वादाने आता चांगलंच राजकीय वळण घेतलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही