Share

देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री होणार? संजय राऊत यांचा मोठा दावा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून, त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्रीपद मिळू शकते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Published On: 

CM Fadnavis

मुंबई : दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) दबावापुढे अखेर मोदी सरकारला झुकावे लागले आहे. धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, या राजीनाम्यामुळे देशभरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींनी जोर धरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना तातडीने बोलावण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, तरी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला आहे. फडणवीस यांची केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती होऊ शकते, म्हणूनच त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे, असे राऊत यांचे म्हणणे आहे.

देवेंद्र फडणवीस यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षणमंत्री होण्याची संधी मिळू शकते, असेही राऊत यांनी नमूद केले. फडणवीस हे वकील आणि सुशिक्षित आहेत, ते विविध विषयांवर आपली मते प्रभावीपणे मांडतात, असे सांगत ते शिक्षणमंत्री बनण्याची दाट शक्यता आहे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यापूर्वी आक्रमक पवित्रा घेत माघार घेण्यास नकार दिला होता, असे राऊत यांनी निदर्शनास आणून दिले.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना परकीय एजंट आणि दहशतवादी ठरवण्याचे प्रयत्न झाले, तसेच या आंदोलनाला परदेशातून निधी मिळत असल्याचा अपप्रचारही केला गेला. हे आंदोलन चिरडून टाकू, अशी गर्जना करत सरकारने अहंकारी वृत्ती दाखवली होती. गेल्या बारा वर्षांतील हे असे दुर्मिळ आंदोलन ठरले आहे, ज्यामुळे एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, असेही राऊत म्हणाले.

“मी त्यांना महाराष्ट्रातच ठेवणार…”

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारमध्ये जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात काही काळापासून सुरू आहे. पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली होती.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीला जाण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, “नाही… नाही… मला महाराष्ट्रातच राहायचे आहे, त्यामुळे मी त्यांनाही महाराष्ट्रातच ठेवणार आहे.” विशेष म्हणजे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापूर्वीच अमृता फडणवीस यांनी हे सूचक विधान केले होते. मात्र, हे विधान केल्यानंतर अवघ्या आठ तासांतच फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केल्यामुळे या विषयावर मोठी चर्चा रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही