Share

‘आज रात्री आम्हाला अटक होणार’; अभिजीत दिपकेंचा मोठा दावा

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी आज रात्री अटकेची शक्यता व्यक्त करत विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

Published On: 

Abhijit Dipke

दिल्ली : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके (Abhijit Dipke) यांनी आज एक मोठा दावा केला आहे. जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान ते म्हणाले, “आज रात्री आम्हाला अटक केली जाणार आहे.” (Arrest Claim) दीपके यांनी विद्यार्थी आणि समर्थकांना आवाहन केले की, “जरी आम्हाला अटक झाली, तरी जंतर-मंतर सोडू नका. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवा.”

अभिजीत दीपके यांनी सरकारला इशाराही दिला आहे. ते म्हणाले, “सरकारने आधीच दोन चुका केल्या आहेत, आता तिसरी चूक करू नका आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्या.” दीपके यांच्या मते, सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना अटक करणे ही सरकारची पहिली चूक होती आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज (Student Protest) करणे ही दुसरी चूक होती. त्यामुळे आता आम्हाला अटक करून तिसरी चूक करू नये. धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेतली जाणार नाही आणि उपोषण मागे घेतले तरीही आंदोलन सुरूच राहील.

दरम्यान, नीट (NEET) आणि इतर परीक्षांमधील पेपरफुटीच्या (पेपर लीक) मुद्द्यावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी CJP च्या नेतृत्वाखाली जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू आहे. अभिजीत दीपके सतत आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संघटित करत आहेत. “आम्ही इथेच बसू, इथेच झोपू आणि इथेच लढा देऊ. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असे आवाहन दीपके यांनी विद्यार्थ्यांना केले.

या आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. आंदोलनाचा कालावधी वाढवण्यास दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे तणाव वाढला आहे. अभिजीत दीपके यांचा हा दावा आणि आवाहन सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हे आंदोलन पुढे कसे चालते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही