Share

NEET Protest: विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर? सोनिया गांधींचा अमित शाहांवर थेट आरोप

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पॅलेट गन वापरल्याचा आरोप करत सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र टीका केली.

Published On: 

sonia gandhi amit shah

दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात ‘पॅलेट गन्स’चा वापर झाल्याचे समोर आले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतर येथे हे आंदोलन सुरू आहे. यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. सोमवारी हे विद्यार्थी संसदेच्या दिशेने कूच करत होते. याशिवाय, दोन दिवसांपूर्वीही जंतर-मंतरवर हिंसाचार झाला होता. आंदोलक आणि पोलीस यांच्यात चकमक उडाली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे सर्वांनी पाहिले. त्याचवेळी आंदोलकांच्या हल्ल्यात पोलीसही जखमी झाले. या सर्व घटनांदरम्यान पॅलेट गन्सचा वापर झाल्याचे उघड झाले आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी या मुद्द्यावरून भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला आहे.

“देशाने एक अत्यंत निराशाजनक दृश्य पाहिले. तरुणांविरुद्ध पॅलेट गन्सचा वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शरीरावर पॅलेट गन्सच्या खुणा दिसून आल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच पॅलेट गन्सच्या वापरास परवानगी दिली, यात काहीच शंका नाही,” असे सोनिया गांधी म्हणाल्या.

सोनिया गांधी काय म्हणाल्या?

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर शिक्षण व्यवस्था कमकुवत केल्याचा आरोप केला. विद्यार्थी केवळ शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि उत्तरदायित्वाची मागणी करत आहेत, परंतु सरकार त्यांच्याशी शत्रूसारखी वागणूक देत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला

सोनिया गांधी यांनी एका लेखात लिहिले आहे की, “आजच्या शिक्षण व्यवस्थेकडून विद्यार्थ्यांना आता कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. ते निराश झाले आहेत. आज विद्यार्थी आंदोलन दोन कारणांमुळे होत आहे. एक म्हणजे आजच्या शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे. दुसरे कारण म्हणजे मोदी सरकारची अरेरावी, तसेच जबाबदारी निश्चित करण्याची आणि सुधारणांसाठी पावले उचलण्याची मागणी. विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची आणि समाजाची नैतिक, राजकीय व घटनात्मक जबाबदारी आहे,” असे सोनिया गांधींनी लेखात नमूद केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही