🕒 1 min read
मुंबई : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आणि पंढरपूर वारीच्या (Pandharpur Wari) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Govt) तयारीला वेग दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संबंधित मंत्र्यांना तातडीने कामाला लागण्याचे निर्देश देत वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
मंत्र्यांना दिल्या स्पष्ट सूचना
वारकऱ्यांना आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
पंढरपूरमध्ये महत्त्वाची बैठक
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पालखी मार्गावरील आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा आणि विठ्ठल मंदिर परिसरातील व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) या बैठकीला उपस्थित राहणार असून, पालखी मार्गावरील वैद्यकीय सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणार आहेत. बैठकीनंतर ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनही घेणार आहेत.
राज्य सरकारकडून यंदाच्या आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमार्फत नियोजन सुरू आहे. याच अनुषंगाने आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राम मंदिर ट्रस्टवर गुन्हा दाखल करा; संजय राऊतांचा हल्लाबोल
- राम मंदिरात सुरक्षा वाढली! दान मोजणीसाठी नवे नियम लागू
- EPFO 3.0 Update: आता UPI द्वारे PF काढता येणार? ATM कार्ड मिळणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












