Share

साताऱ्यातील वादावर पडदा! एकनाथ शिंदेंचा थेट आदेश, शंभूराज देसाई आता ‘तो’ वचपा काढणार का?

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीत बिघाडी टळली. एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर शिवसेनेची सर्व मते भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मिळणार आहेत.

Published On: 

Satara Sangli MLC Election Eknath Shinde gives strict order to Shambhuraj Desai for voting

सातारा-सांगली – राजकारणात कालचा शत्रू आजचा मित्र कसा होतो, हे पाहायचं असेल तर सध्याचं सातारा-सांगली विधान परिषदेचं राजकारण पाहा. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला राडा आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे नेते आता पुन्हा गळ्यात गळे घालणार का?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या सगळ्या राजकीय तणावावर आता थेट पडदा टाकला आहे. त्यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना स्पष्ट शब्दांत आदेश दिलाय. शिवसेनेचे एकही मत फुटता कामा नये, प्रत्येक मत हे भाजपचे आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच पडले पाहिजे, असा सक्त आदेश शिंदेंनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde gives strict order to Shambhuraj Desai

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम विरुद्ध शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप अशी थेट लढत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे बहुमत असतानाही भाजपने आपला उमेदवार निवडून आणला होता. मित्रपक्षांची मते फोडल्याने तेव्हा मोठा राडा झाला होता. त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांची पोलिसांसोबत झटापटही झाली होती.

त्यामुळेच या विधान परिषद निवडणुकीत शंभूराज देसाई भाजपचा वचपा काढतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मध्यंतरी देसाईंनी शिवसेनेच्या स्थानिक मतदारांची बैठक घेऊन त्यांचा कानोसा घेतला आणि तो अहवाल उप-मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. आता खुद्द एकनाथ शिंदेंनीच महायुतीचा धर्म पाळण्याची आणि सर्व मते धैर्यशील कदम यांच्या पारड्यात टाकण्याची ताकीद दिल्याने, भाजप गोटात असलेली धाकधूक कमी झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही