Share

कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने भररस्त्यात दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, सरकारला दिला गंभीर इशारा

सरसकट कर्जमाफीच्या अटींचा निषेध करत वाशिममध्ये शेतकऱ्याने भररस्त्यात स्वतःची दुचाकी पेटवली. मागणी मान्य न झाल्यास थेट मंत्र्यांच्या गाड्या जाळण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Published On: 

Washim farmer burns his own bike demanding blanket loan waiver from Maharashtra government

🕒 1 min read

वाशिम– राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील अटी आणि शर्तींमुळे सध्या शेतकऱ्यांमधील असंतोष शिगेला पोहोचला आहे. याच्याच निषेधार्थ वाशिमच्या अडोळी येथे सतीश इडोळे या तरुण शेतकऱ्याने आपली दुचाकी जाळून थेट सरकारला आव्हान दिलं आहे.

विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच सरकार कर्जमाफीची अंमलबजावणी करणार आहे. पण यात अनेक जाचक अटी लादण्यात आल्याने शेतकरी संघटनांनी याला कडाडून विरोध केलाय. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनानंतर आता रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सरसकट कर्जमाफीसाठी (Farmer Protest) जोरदार आंदोलन पुकारलंय.

याच आंदोलनाला आणि तुपकरांना पाठिंबा देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला सरसकट न्याय मिळावा आणि सरकारने अटी रद्द कराव्यात, हीच त्यांची एकमुखी मागणी आहे.

शेतकऱ्यांच्या भावना सरकारने वेळीच समजून घ्याव्यात, अन्यथा हे आंदोलन आणखी चिघळेल. आज दुचाकी पेटवलीय, पण यापुढे थेट मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या पेटवायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा अत्यंत आक्रमक इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या संतापाची कशी दखल घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही